करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

भारतीय स्टेट बँक करमाळा शाखेच्या वतीने मयताच्या कुटुंबियाकडे दोन लाखाचा विमा धनादेश सुपूर्द

करमाळा

राशीन पेठ करमाळा येथील राधिका विवेक बागडे यांचा आजारपणामुळे मृत्यू झाल्यामुळे प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेअंतर्गत दोन लाखाचा विमा धनादेश भारतीय स्टेट बँक करमाळा शाखेचे शाखाधिकारी सुनील बिडगर यांच्या हस्ते मयताच्या कुटुंबियाना सुपूर्द केला. त्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळलेल्या बागडे कुटुंबियांना आर्थिक दिलासा मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे..
मयत राधिका विवेक बागडे यांचे १७/११/२०२५ रोजी आजारपणामुळे दुःखद निधन झाले.. मृत्युपूर्वी त्यांनी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेअंतर्गत स्टेट बँकेत विमा उतरवला होता. मयत राधिका बागडे यांच्या मृत्यूनंतर बँकेने त्यांच्या कुटुंबियांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या कुटुंबियांनी अर्ज केल्यानंतर बँकेतील पदाधिकाऱ्यांनी तत्काळ कार्यवाही करून दोन लाखाचा विमा चेक मयताचे पती विवेक बागडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी खातेधारकांनी बँकेत खाते उघडून फॉर्म भरणे आवश्यक आहे… अपघाती निधनाने होणाऱ्या मृत्यूसाठीच्या विम्याचा वार्षिक हप्ता २० रुपये आहे तर नैसर्गिक मृत्यूच्या विम्याचा वार्षिक हप्ता ४३६ रुपये आहे… याचा फायदा भविष्यात खातेधारकाना होतो. प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक मृत्यू , अपघाती मृत्यू ओढवल्यास आर्थिक मदत मिळते. तरी बँकेच्या या योजनेचा खातेधारकांनी लाभ घ्यावा असे आवाहन स्टेट बँक करमाळा च्या वतीने करण्यात आले. मयताच्या कुटुंबियाना धनादेश सुपूर्द करतेवेळी शाखाधिकारी सुनील बिडगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपशाखाधिकारी योगेश समेळ, क्षेत्रीय अधिकारी सचिन रोकडे, रोकड अधिकारी सचिन निकम, एसबीआय ग्राहक सेवा प्रतिनिधी गणेश केंडे उपस्थित होते..

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE