करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळा तालुक्यात प्रविण मुरूमकर यांचा सत्कार समारंभ उत्साहात होणार

करमाळा :

सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल मा. श्री. प्रविण प्रकाश मुरूमकर यांचा सत्कार समारंभ सोमवार दि. २३ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम जि.प. प्राथमिक शाळा, पांढरंगावली, बिटरगाव (श्री) येथे पार पडणार आहे.

या समारंभासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी मा. अंजन कृष्णा (IPS),तहसीलदार मा. सौ. शिल्पाताई ठोकडे, पोलीस निरीक्षक मा. रणजित माने, गटविकास अधिकारी मा. अमित कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. गिरिजा मस्के आदींची उपस्थिती लाभणार आहे. तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील इतर मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत.

प्रविण मुरूमकर यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून केलेल्या योगदानाची दखल घेत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन जि.प. प्राथमिक शाळा पांढरंगावली, बिटरगाव (श्री) येथील शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE