करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळा तालुक्यातील पुढाऱ्यांसह विकासाचे स्वप्न अंधारमय; भाजपकडून सर्वांना गोंजारण्याचा प्रयत्न

करमाळा समाचार

करमाळा तालुक्यात विकासाच्या मोठमोठ्या घोषणा होत असल्या तरी प्रत्यक्षात अनेक प्रश्न अद्याप प्रलंबितच असल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्ते, पाणी, वीज, रोजगार आणि औद्योगिक विकास यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर ठोस काम न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. तालुक्यातील अनेक पुढारी विकासाच्या नावाखाली आश्वासने देताना दिसतात; मात्र प्रत्यक्ष कृतीत कमतरता असल्याची चर्चा जनतेत सुरू आहे.

राजकीय पातळीवर आगामी राजकीय समीकरणाचा विचार करून भाजपकडून सर्वच गट आणि नेत्यांना गोंजारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. नाराज कार्यकर्ते, स्थानिक नेते आणि विविध संघटनांना जवळ घेण्याचे प्रयत्न वाढले असून, यामागे राजकीय समीकरणे मजबूत करण्याचा डाव असल्याची चर्चा आहे.

तालुक्यातील सर्वच प्रमुख पुढारी सत्ताधारी पक्ष किंवा भाजपाच्या संपर्कात आहेत. यातून प्रत्येकालाच आपल्या पदरात भाजपचे प्रेम पडेल हा आत्मविश्वास आहे. पण बऱ्याच काळापासुन संपर्कात असूनही कोणाचा अपेक्षित असा फायदा होतोय असे दिसून येत नाही. तालुक्याचे आमदार नारायण पाटील जरी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडून असले तरी सध्या त्यांची वाटचाल भाजपा किंवा मित्र पक्षांसोबत जवळीकीची झाली आहे. त्यामागे बंद असलेला आदिनाथ कारखाना व तालुक्यासाठी विकास निधीचा विषय असु शकते पण केवळ जवळ घेऊन गोंजारण्या पलीकडे काय होताना दिसत नाही.

तर अडचणीत असताना बागल गटाने भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनाही भाजपाकडून मोठी अपेक्षा होती. बंद पडलेले कारखाने तसेच बागल गटाचे व स्वतःचे राजकीय वलयं पुन्हा निर्माण करण्यासाठी दोघां बहीण भावाने पक्षात प्रवेश केला. तालुक्यासह राज्यात वेळ देत कामही केले जिथे एकही पदाधिकारी जिंकून येऊ शकत नव्हता तिथे आज भाजपाची नगरपरिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद मध्ये सत्तेत हिस्सेदारी आहे. पण आजही मकाई कारखाना बंद अवस्थेत आहेच शिवाय स्वतःचा गट सोडून भाजपात गेले असले तरी राजकीय परिस्थिती अजूनही अंधारमय आहे. प्रत्येकाचं गोष्ट भाजपाच्या नेतृत्वावर अवलंबून राहावं लागतं आहे. मोठा गट असूनही तालुक्याची सूत्र त्यांच्या हातात जातं नाहीत ही बाब गांभीर्याने घेणेजोगी आहे.

याशिवाय माजी आमदार संजयमामा शिंदे हे माढा तालुक्यातील व करमाळा विधानसभा क्षेत्रातील 36 गावातून येत असले तरी त्यांचे करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात प्रस्थ अधिक आहे. भाजपचे प्रमुख पदाधिकारीही संजयमामांचे फॅन आहेत. त्यांच्या नेतृत्वावर पदाधिकारी विश्वास दर्शवताना दिसलेलं आहेत. पण भाऊबंद भाजपवासी झाले तरी अजूनही शिंदेमामा काय अजून गेले नाहीत की त्यांना घेतले जात नाही हा चर्चेचा विषय आहे. पण त्यांचीही भाजपा सोबत जवळीक लपून राहिलेली नाही. त्यांचे व पालक मंत्र्यांसह प्रमुख नेत्यांचे संबंध चांगले आहेत. पण येणाऱ्या काळात वर उल्लेख केल्याप्रमाणे सगळ्यांनाच जवळ केलय मग भाजपा राजकारणात संधी देईल का? त्यांनाही सुरक्षित अंतरावर ठेवले आहे हा येणारा काळ सांगेल.

तर सामाजिक कामे व जरांगे यांच्याशी जवळीक असताना भाजपात प्रवेश करून आपलें राजकीय वलयं निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रामदास झोळ यांना अजूनही पक्षाने अपेक्षित अशी जबाबदारी दिलेली दिसत नाही. ते अजून स्वतःच त्या पक्षाचे मोठे प्रस्थ असल्यागत वावरताना दिसतात पण त्यांना कोणत्याही नियोजनात सक्रिय करून घेतल्याच दिसत नाही त्यामुळे त्यांचेही राजकीय भवितव्य भाजपात असेल का नाही हा प्रश्न आहे. यांच्याच अडचणी आहेत तर अजून बरेच छोटे मोठे पुढाऱ्यांचे काय होईल हा मोठा प्रश्न आहे.

त्यामुळे भाजपा कोणाला जवळ करून फायदा करून देण्यापेक्षा सध्यातरी फक्त गोंजारण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्वसामान्य नागरिक मात्र “विकासाचे स्वप्न नेमके पूर्ण कधी होणार?” असा सवाल उपस्थित करत आहेत. तालुक्याच्या प्रगतीसाठी केवळ राजकीय भेटीगाठी नव्हे तर प्रत्यक्ष विकासकामांची गरज असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE