जेऊरमध्ये वाहतूक नियमभंगावर पोलिसांचा दणका; 47 वाहनधारकांकडून ₹1.30 लाखांचा दंड
करमाळा समाचार

जेऊर परिसरामध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून यावेळी 47 वाहनधारकांना एक लाख तीस हजार पाचशे रुपयांचा दंड करण्यात आला आहे. सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

आज अंजना कृष्णा आय पी एस. व पोलीस निरीक्षक रणजित माने आदेशानुसार सपोनि दिलीप ढेरे याचेसह करमाळा निर्भया पथकांचे अंमलदार पोहवा मंगेश पवार, संभाजी पवार, गणेश गुटाळ, विद्या इंगोले व करमाळा वाहतूक शाखाचे अंमलदार दिपक कांबळे प्रविण चव्हाण, तसेच जेऊर ओपी चे अंमलदार पोहवा चंद्रहास निमगीरे, चेतन पवार यांनी जेऊर शहरांमध्ये बस स्थानक, सराफ कट्टा, भारत हायस्कूल परिसर या भागामध्ये पेट्रोलिंग करून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या इसमांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे. तसेच रोड रोमियो यांचेवर कारवाई केलेली आहे.
सदरच्या कारवाईदरम्यान 11 टुकार फिरणाऱ्या वाहन चालकावर कारवाई करण्यात आली . सदरच्या कारवाईमुळे जेऊर व परिसरातील टुकार वाहनधारकांची धाबे दानाणले होते. तर पालकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. मागील बऱ्याच दिवसापासून करमाळा शहर व परिसरात अशा पद्धतीच्या कारवाया केल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली होती. तशीच कारवाई जेऊर येथे झाल्याने नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर जरब बसेल.



