सोलापूर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्थेची 47 वी वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न
करमाळा

सोलापूर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्थेची 47 वी वार्षिक सर्व साधारण सभा दि 12 रोजी “अथर्व मंगल कार्यालय श्री देवीचा माळ करमाळा येथे संस्थेचे चेअरमन श्री.नेमचंद भुजबळ भाऊसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेस करमाळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री.डॉ.अमितजी कदम प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.

याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन DNE 136 चे “राज्य सल्लागार” श्री.राजेश माळी,अहिल्यानगर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी युनियन चे जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्री.युवराज दादा पाटील अहिल्यनगरचे चेअरमन श्री.संदीप लगड, सोलापूर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ व सोलापूर जिल्हा व तालुका युनियन DNE -136 चे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात आई कमलाईदेवीमाता यांच्या तसेच पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन कै.गजानन सुरवसे व संस्थापक सचिव कै.शुक्राचार्य पाटील यांची प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून झाली.
सभेचे प्रस्ताविकामध्ये पतसंस्थेचे मानद सचिव श्री.महादेव भुसे यांनी पतसंस्थेचा सन 2024-2025 चा लेखा-जोखा सभासदांसमोर मांडला.

631 सभासद संख्या आलेल्या पतसंस्थेचे जवळपास 11.50 कोटी भागभांडवल असुन अहवाल वर्षात 144 सभासद यांना द.सा.द.शे. फक्त 6% व्याज दराने 15 कोटींचे कर्ज वाटप करून सर्व सभासद यांना शेअर्स रक्कमेवर 5% प्रमाणे लाभांश वाटप त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा केला आहे. तसेच पतसंस्थेस अहवाल वर्षात झालेल्या नफ्यामधून सर्व सभासदांना रक्कम रु 6 लक्षच्या भेट वस्तू (milton डब्बा) भेट वाटप केले आहे. तसेच संस्थेकडे जमा झालेल्या 52 लाख रुपये कुटुंब कल्याण निधी मधून अहवाल वर्षात मयत सभासद यांच्या वारसाना 15 लक्ष चे वाटप केलेले असून संस्थेचे सन-2025-2026 अखेर वैधानिक लेखापरीक्षण पूर्ण केले असून संस्थेस ” अ ” वर्ग मिळालेला असलेचे सांगितले.
प्रास्ताविक नंतर उपस्थित मान्यवर यांचा पतसंस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला तसेच सभासद यांच्या गुणवंत (इयत्ता 10 वी;12वी) पाल्यांना पतसंस्थेच्या वतीने रोख रक्कम,80000/- व सन्मानचिन्ह देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच सन- 2025 वर्षात मध्ये सेवानिवृत्त झालेल्या सभासद यांनाही पतसंस्थेचे संचालक यांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सपत्नीक सन्मान करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यानंतर सभेच्या कामकाजामधील सभापत्रिकेवरील विषयानुसार सभागृहात विचार विनिमय करून सभा सर्व सभासद बंधु-भगिनी यांच्या उपस्थितीत सभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली. सभेनंतर सर्व सभासद यांनी सुमधुर भोजनाचा आस्वाद घेतला सभेचे आयोजन कामी करमाळा तालुका ग्रामपंचायत अधिकारी युनियन DNE -136 चे अध्यक्ष श्री. सुसेन ननवरे ;सचिव श्री. मनोज लटके;संचालक श्री.सचिन सरडे सर्व तालुका कार्यकारणी व युनियन सभासद यांनी सभेचे उत्कृष्टआयोजन आणि नियोजन केल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून आभार मानले.


