करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळ्यात पुन्हा मोकाट कुत्र्यांचा हैदोस; नगरपरिषदेची मोहीम निष्प्रभ?

करमाळा :

काही महिन्यांपूर्वी करमाळा नगरपरिषदेने शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कुत्रे पकडण्याची मोहीम राबवली होती. मात्र, या मोहिमेचा अपेक्षित परिणाम दिसून न आल्याचे चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे. शहरातील अनेक गल्ली-बोळ, मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांची संख्या पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढल्याची नागरिकांची तक्रार आहे.

विशेष म्हणजे, सध्या कुत्र्यांच्या प्रजननाचा काळ सुरू असल्याने येत्या काही महिन्यांत मोकाट कुत्र्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकीस्वारांना विशेष त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, केवळ कुत्रे पकडण्याची मोहीम राबवून प्रश्न सुटणार नाही. यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने निर्बीजीकरण (ABC कार्यक्रम), लसीकरण आणि सातत्यपूर्ण नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. अन्यथा दरवर्षी हीच परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांची गैरसोय वाढत राहील. याबाबत करमाळा नगरपरिषदेने तातडीने प्रभावी उपाययोजना करून मोकाट कुत्र्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE