करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

पोथरे येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक व जाहीर व्याख्यान

पोथरे : प्रतिनिधी


साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पोथरे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी गावातून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.आयोजन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती, पोथरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

तसेच मंगळवार, दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता पोथरे येथे महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले दंगलकार, विद्रोही व बेधडक कवी मा. नितीनजी चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर आणि त्यांच्या साहित्यिक व सामाजिक योगदानाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती, पोथरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE