जेष्ठ पत्रकार नासिर कबीर यांचा जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट तालुका प्रतिनिधी म्हणून गौरव
करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुका पत्रकार संघाचे सचिव तसेच दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी यांना जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट तालुका प्रतिनिधी म्हणून सोलापूर येथे आज एका कार्यक्रमांमध्ये गौरविण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यात दै.लोकमत मधून सर्वोत्कृष्ट तालुका प्रतिनिधी म्हणून नासीर कबीर यांचा गौरव लोकमत चे पश्चिम विभागाचे अलोक श्रीवास्तव, कार्यकारी संचालक मिलिंद कुलकर्णी,सरव्यवस्थापक भोगशेट्टी यांनी त्यांचा सन्मान चिन्ह देऊन विशेष गौरव केला आहे.

करमाळा येथील ज्येष्ठ पत्रकार नासिर भाई कबीर यांनी केली 40 वर्षाहून अधिक कालखंडापासून दैनिक लोकमत मध्ये तालुका प्रतिनिधी म्हणून एक उत्कृष्ट प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. आज पर्यंत त्यांनी विविध सामाजिक राजकीय भौगोलिक प्रश्नावर सडेतोड लिखाण करून तालुक्यामध्ये नावलौकिक मिळवले आहे. त्यांनी आजपर्यंत पूरग्रस्तांच्या व्यथा तसेच तथाकथित भोंदू महाराज मनोहर मामा भोसले यांच्या भोंदूगिरीच्या लेखमाला अविरतपणे चालू ठेवून त्या प्रश्नांना वाचा फोडली होती. याशिवाय विविध प्रश्नावर त्यांनी आजपर्यंत निर्भीड लिखाण केले होते त्यांच्या या उत्कृष्ट लिखाणाची पोच पावती म्हणून त्यांना आज सोलापूर येथे झालेल्या लोकमतच्या पश्चिम महाराष्ट्र बैठकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील एक उत्कृष्ट तालुका प्रतिनिधी म्हणून गौरविण्यात आले आहे.
त्यांना सर्वोत्कृष्ट तालुका प्रतिनिधी म्हणून गौरविण्यात आल्याबद्दल त्यांचे करमाळा तालुका पत्रकार संघटने सहित पत्रकार संघटनेचे सक्रिय सदस्य व सर्व पोर्टल मीडिया पत्रकार संघ आदि पत्रकारांनी विशेष अभिनंदन केले आहे.



