करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

करमाळा,

शिक्षक दिनाचे औचित्य साधून करमाळा नगरपरिषदअंतर्गत शाळांमधील उल्लेखनीय शैक्षणिक काम करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी विविध गुणवंत विद्यार्थ्यांना आणि मार्गदर्शक शिक्षकांना गौरविण्यात आले.

याप्रसंगी नगराध्यक्षा मोहिनी सावंत, उपनगराध्यक्ष अतुल फंड, नगरसेवक संजय सावंत, मुख्याधिकारी सचिन तपसे, प्रशासन अधिकारी जयवंत नलवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सुषमा उबाळे व चंद्रकला टांगडे यांना आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सुनंदा जाधव, समाजदीप पुरस्कारासाठी

संध्या शिंदे, दहावीचा निकाल शंभर टक्के लागल्याबद्दल जुबेर जनवाडकर, उल्लेखनीय पटासाठी मुख्याध्यापक दयानंद चौधरी, केंद्रसमन्वयक निवड झाल्याबद्दल विक्रम राऊत, सेवानिवृत्तीबद्दल शिवदास कोकाटे यांना सन्मानीत करण्यात आले.

गुणवंत विद्यार्थी शर्विल मस्कर, पृथ्वीराज घोलप, विश्वजीत सावंत, शिवांश लावंड, सुयश चौधरी, श्रेयश बोबडे, शरयू फरतडे, इकरा शेख, शाहिस्ता शेख, जारा कुरेशी तसेच सुषमा उबाळे, अश्विनी ठाकरे, सुरेश कोळी, रमेश नामदे या मार्गदर्शक शिक्षक, शिक्षिकांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

केंद्र समन्वयक विक्रम राऊत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सूत्रसंचालन संध्या शिंदे यांनी केले. आभार दयानंद चौधरी मानले.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE