आध्यात्मिककरमाळाताज्या घडामोडीसकारात्मकसामाजिकसोलापूर जिल्हा

गौराईचे आगमन आणी करमाळ्यातील शिक्षक दांपत्याचा कौतुकास्पद उपक्रम

करमाळा समाचार

गौराई येती माहेराला गौरी-गणपतीच्या सणाला….

आज करमाळा येथील रहीवासी सौ.रेश्मा प्रसाद मिरगणे यांनी महालक्ष्मी उत्सव कोरोनाविषयक जनजागृती संदेश देऊन साजरा केला. कुर्डुवाडी न.पा.शाळेत प्राथमिक शिक्षिका पदावर काम करणाऱ्या सौ.मिरगणे नेहमी नवनवीन उपक्रम राबवत असतात. त्यांना याकामी पती श्री.प्रसाद मिरगणे (प्राथमिक शिक्षक), सासु श्रीम धनश्री मिरगणे (प्राथमिक शिक्षिका), बंधु डाॅ.नागनाथ लोकरे यांचे मार्गदर्शन लाभले.

politics

कोरोना महामारी सर्वत्र थैमान घातलेले असताना भारतीयांनी मोठ्या धिराने कोरोना चा सामना करत आहेत. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण जनजागृती करण्यात मागे राहत नाहीत. तर हात स्वच्छ धुवा, सॅनिटायझर वापरा असे संदेश अनेकदा तुम्ही टीव्हीच्या व मोबाईलचा डायलर टोन मधून ऐकलेले असतीलच. पण आता करमाळ्यातील एका शिक्षक दांपत्याने कोरोना बाबत जनजागृती करताना थेट आकर्षक अशा लक्ष्मीपूजनाचा माधमाचा योग्य वापर करीत गौरी आगमनावेळी या ठिकाणी रांगोळी तसेच बॅनरच्या माध्यमातून सूचना देऊन तर दोन्ही लक्ष्मी यांना कोरोनायोद्धे डॉक्टरांचा पेहराव केल्याने चर्चेचा विषय ठरत आहेत. मिरगणे दाम्पत्याने केलेल्या सजावटीचे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE