करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; २८ हरविलेले मोबाईल तक्रारदारांना परत

करमाळा :

करमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन २०२४, २०२५ आणि २०२६ या कालावधीत हरविलेले तब्बल २८ मोबाईल फोन, अंदाजे ६ लाख ३० हजार रुपये किमतीचे, करमाळा पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शोधून काढत संबंधित तक्रारदारांना परत केले.
सायबर पोलिसांच्या मदतीने तसेच CEIR पोर्टलच्या माध्यमातून हरविलेल्या मोबाईलचा शोध घेण्यात आला. या कारवाईत २८ मोबाईलचा शोध घेऊन ते त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले.

ही कारवाई करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. CEIR पोर्टलचे काम पाहणारे पोलीस कर्मचारी स्वप्नील शेरखाने, प्रकाश जगदाळे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे सोनवणे यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. हरविलेले मोबाईल मिळाल्याने तक्रारदारांनी पोलिसांच्या या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन
मोबाईलमध्ये वैयक्तिक माहिती, फोटो, बँकिंगसह महत्त्वाची कागदपत्रे असतात. त्यामुळे मोबाईल वापरताना नागरिकांनी OTP, PIN, पासवर्ड किंवा UPI PIN कोणालाही सांगू नये, मोबाईलला स्क्रीन लॉक ठेवावा आणि अनोळखी लिंक, APK अथवा संशयास्पद ॲप डाउनलोड करू नये, असे आवाहन करमाळा पोलिसांनी केले आहे. तसेच मोबाईल हरवल्यास तात्काळ SIM आणि बँकिंग सेवा सुरक्षित करून पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी केले आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE