दत्त पेठ तरुण मंडळाच्या गणेशोत्सव अध्यक्षपदी रितेश कटारिया यांची निवड
करमाळा:

करमाळा : शहरातील मानाचे आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या दत्त पेठ तरुण मंडळाच्या आगामी गणेशोत्सव अध्यक्षपदी रितेश कटारिया यांची एकमताने निवड करण्यात आली. मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत मंडळाच्या विविध पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सुंदर महामुनी व नितेश देवी, खजिनदारपदी हर्षा घोडेगावकर व अजिंक्य महाजन, कार्याध्यक्षपदी भणगे, तर मिरवणूक प्रमुखपदी मनोज भणगे व शिवम तांगडे यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी धनराज महाजन यांची निवड करण्यात आली.
यावेळी नगरसेवक विक्रम परदेशी, अमोल परदेशी, अभय महाजन, संग्राम देशमुख, अरुण तांगडे, विश्वजीत परदेशी, प्रदीप देवी, संकेत खाटेर यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
बैठकीला मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, माजी पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी गणेशोत्सव शिस्तबद्ध, पारंपरिक तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
गणेशोत्सवाच्या आयोजनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी रितेश कटारिया यांच्या खांद्यावर सोपविण्यात आल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.



