करमाळासोलापूर जिल्हा

सावंत यांनी मॅटची सुविधा उपलब्ध करुन करमाळा तालुक्यातील मल्लविद्देला प्रोत्साहन देण्याचे काम केले

करमाळा समाचार

करमाळा तालुक्यात नामांकित मल्लाची पंरपरा असुन कुस्तीला प्रोत्साहन देऊन करमाळा तालुक्यात यशस्वी मल्ल तयार करण्यासाठी किरण तात्या सावंत यांनी मॅटची सुविधा उपलब्ध करुन देऊन करमाळा तालुक्यातील मल्लविद्देला प्रोत्साहन देण्याचे काम केले असल्याचे मत शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरतभाऊ आवताडे यांनी व्यक्त केले.

भैरवनाथ शिवशक्ती तालीम विहाळ ता. करमाळा या तालीमसाठी भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक किरण तात्या सावंत यांच्या दातृत्वातुन कुस्ती मॅटचा लोकार्पण सोहळा शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरतभाऊ आवताडे यांच्या हस्ते संपन्न झाला.

याकार्यक्रमास मनसे शहराध्यक्ष नानासाहेब मोरे भैरवनाथ तालीम वस्ताद आण्णा नायकुडेपिंटु दंडे वस्ताद, जालिंदर सौताडे बळीराम बरबडे ,बाळु मोडळे सुरेश नाना शिंदे , बाळासाहेब मोडळे. रावसाहेब जानभरे वस्ताद आण्णा नायकवडे ,पै अमित गायकवाड.पै. करण मिसाळ. पै रामदास गोसावी, पै शाहरुख मूलाणी.पै सागर मोरे.पै मिथुन चव्हाण आदी उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE