लहान मुलाला मारहाण करणारा शिक्षकाला ग्रामस्थानी दिला चोप ; काल पासुन महाराष्ट्रत फिरतोय विडिओ
करमाळा समाचार टीम –
मसौरी (बिहार राज्य जिल्हा पाटना) – धनरुआ पोलीस ठाणे परिसरात वीर महादेव येथील खाजगी कोचिंग क्लास मध्ये एका शिक्षकांनी अतिशय वाईट पद्धतीने एका सहा वर्षाच्या मुलाला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या वायरल व्हिडिओची मागील माहिती उजेडात आली असून सदरचा शिक्षक हा मसौरी (आटना) भागातील आहे.

या संस्थेचे संचालक विकास कुमार यांनी क्लासमध्ये येत असलेल्या सहा वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण केली होती. सदरचा व्हिडिओ कोणीतरी लपून काढला व व्हायरल केला हा व्हिडिओ पाहून ग्रामस्थ चांगलेच भडकले व त्यांनी त्या कोचिंग क्लास मध्ये येऊन तोडफोड करीत शिक्षकाला चांगलाच झोप दिला. यावेळी मार सुरू असताना सदरचा शिक्षक हा फरार झाला आहे.

लहान मुलाला मोठ्या प्रमाणावर मारहान झाल्याने त्याला मानसिक धक्का तर बसलाच आहे. शिवाय त्याला सिटीस्कॅन साठी पाठवण्यात आले आहे. त्या लहान मुलाने संबंधित शिक्षकाला एका मुलीसोबत चुकीचे चाळे करताना पाहिल्यामुळे शिक्षकाला याचा राग आला व त्याने त्या मुलाला मारहाण केली अशी माहीती समोर आली आहे.
याप्रकरणी पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलीस त्या व्हिडिओचा तपासणी करीत आहेत. शिवाय संबंधित शिक्षकाचाही शोध घेत आहे. सदर प्रकरणातील व्हिडिओ काल दिवसभर सोशल माध्यमातून महाराष्ट्रभर फिरत होता. तर संबंधिताला कडक शासन करावी अशा सूचना लोक देत होते. अतिशय संताप जनक असा व्हिडिओ पाहून प्रत्येक जण शिक्षकाला शिक्षा देण्याबाबत बोलत असताना हा शिक्षक मिळून आल्याने पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.