जिंती येथे ऑनड्युटी रेल्वे पोलिस कर्मचाऱ्याचा अपघात ; पोलिस ठार
करमाळा समाचार
रेल्वे गाड्यांची क्रॉसिंग होत असताना चेकिंग साठी गेलेल्या रेल्वे पोलीस शिपाई श्रीकांत वाघमारे (वय ४२) रा. कुर्डुवाडी ता. माढा यांचा अपघात झाल्याची घटना शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास घडली आहे. यामध्ये वाघमारे यांचा जागी मृत्यू झाला आहे.

ते रेल्वे क्रॉसिंग असताना सिग्नल चेकिंग साठी आले होते. त्यावेळी सदरचा अपघात झाला. त्यांना वेगवान जात असलेल्या केके एक्सप्रेस या गाडीने चोराची धडक दिल्याने ते जागीच ठार झाले सदरची घटना जिंती रोड सिग्नलला झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाघमारे हे रेल्वे पोलीस म्हणून कार्यरत होते. ते व जी आर पी एफ चे कर्मचारी रेल्वे चेकिंग साठी परिसरात असताना पुढे चेकिंग करून येतो म्हणून श्रीकांत वाघमारे हे इतर कर्मचाऱ्यांपासून पुढे गेले होते. त्यावेळी काकीनाडा व केके एक्सप्रेस यांची क्रॉसिंग होत होती.
त्यावेळी वेगवान येणाऱ्या केके एक्सप्रेसचा वाघमारे यांना अंदाज आला नसावा व त्या गाडीने त्यांना जोराची धडक दिल्याने श्रीकांत वाघमारे हे जागीच ठार झाले आहेत. यावेळी जीआरपीएफ व रेल्वे पोलीस यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलवली व त्यांना करमाळ्याच्या दिशेने पाठवण्याचे नियोजन होते.