करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

उमेदवारीच्या चाचपणी बैठकीत तुफान राडा ; पुरुषांच्या भांडणानंतर महिलाही भिडल्या

समाचार

दोन चार लोकच समाजाचे मालक असल्यासारखे करू लागले आहेत. मनोज जरांगे पाटील यांचा आम्हाला आदर आहे परंतु अशा लोकांमुळे समाजाची बदनामी होत आहे. काही लोकच आपले कार्यकर्ते समोर करुन नाव सुचवले जात असल्याचे कारण पुढे करत छ. संभाजी नगर मध्ये मराठा समाजाच्या विचारविनिमय बैठकीत पुरुषांसह महिलांमध्येही राडा झाल्याचे दिसुन आले.

मनोज जरांगे पाटील यांनी गावोगावी बैठका घेऊन विचारविनिमय करून उमेदवार ठरवावा अशी मराठा समाजाला सूचना दिलेली असताना त्यानिमित्ताने सर्व भागात अशा प्रकारच्या बैठका सुरू आहेत. पण काही कार्यकर्ते मूळ कार्यकर्त्यांना सोडून केवळ आपल्याच गटाच्या कार्यकर्त्यांना जवळ करून अशा बैठका वेगवेगळ्या भागात घेत असल्याचे दिसून आले होते.

तसाच प्रकार संभाजीनगर येथेही उघडकीस आला. या ठिकाणी मूळ कार्यकर्त्यांना सोडून काही लोकांच्या माध्यमातून सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वांना का बोलवले नाही, शिवाय या बैठकीचे नियोजन करीत असताना दिलेल्या सूचनांचे पालन करण्यात आले नाही हे कारण समोर करत सुरुवातीला पुरुषांमध्ये तर नंतर महिलांमध्ये मारहाण झाली.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE