करमाळा तालुक्यात बिबट्याचा कहर कायम ; बिबट्याच्या हमल्यात दुसरा बळी
करमाळा समाचार

करमाळा तालुक्यात बिबट्याचा कहर आणखीनच वाढला असून वेगवेगळ्या ठिकाणी पाळीव प्राणी तर आता अंजनडोह येथे एका महिलेला आपले शिकार बनवण्याची घटना नुकतीच घडली आहे. त्याठिकाणी पोलिस पथक तसेच वन विभागाचे अधिकारी पोहोचून अधिक माहिती घेत आहेत. तरी प्रत्येक गावातच लोकांनी जागृत राहावे अशा सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

आष्टी, कर्जत भागात बिबट्याने आपली दहशत पसरल्यानंतर गुरुवारी करमाळा तालुक्यातील लिंबेवाडी येथे एका युवा शेतकऱ्याचा बळी घेतला होता. त्यानंतर दोन दिवसांमध्ये काही ठिकाणी पाळीव प्राण्यांवर हल्ले झाले. मात्र ते नेमके बिबट्याचे होते काय इतर प्राण्यांचे हे कळू शकले नव्हते.
पण आज पुन्हा एकदा अंजनडोह येथे थरारक असा हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. त्याठिकाणी महिलेचे फक्त मुंडके मिळून आले आहे. शरीर अद्यापही मिळून आले नाही. त्यामुळे हा पुन्हा एकदा बिबट्याने चा हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. तरी प्रत्येक गावोगावी नागरिकांनी ग्रामस्थांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
