E-Paperकरमाळासामाजिक

वक्तृत्व स्पर्धेत सा. ना. जगताप मुली नं. 1 शाळेच्या अनन्या पवार ने मिळवली हॅट्ट्रिक

करमाळा समाचार

यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या वसंत महोत्सव (2025 – 26) वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात ( पहिली ते चौथी) पीएमश्री. साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथ.मुलींची शाळा नं.1 न. प. करमाळा या शाळेच्या कु. अनन्या जनार्धन पवार (इयत्ता 3री – ब ) हिने सलग तीन वर्ष प्रथम क्रमांक मिळवून विजयाची हॅट्ट्रिक मिळवून वक्तृत्व स्पर्धेतील स्वतः चा प्रभाव लहान वयातच दाखवून देत उज्वल यश संपादन केले आहे.

तिला रोख रक्कम 1000/- रु सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या शाळेतील कु.अन्वी महेश थोरे (इयत्ता- पहिली ब) कु. काव्यांजली कर्चे (इयत्ता- दुसरी ब ) कु. स्वरा रोहित परदेशी (इयत्ता – दुसरी-अ ) कु. संघर्षा गौरव कांबळे (इयत्ता – तिसरी – ब ) कु.श्रावणी खराडे (इयत्ता – तिसरी ब) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवून यशाचा उच्चांक गाठला.

उत्तेजनार्थ मुलींना रोख रक्कम 300/- रु,सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व मेडल देऊन त्यांना सन्मानित केले. या स्पर्धेत शाळेतील 60 मुलींनी सहभाग घेतला या सर्व विद्यार्थिनींना मुख्याध्यापक श्री.दयानंद चौधरी सर,वर्गशिक्षिका भाग्यश्री पिसे मॅडम, मोनिका चौधरी मॅडम, तृप्ती बेडकुते मॅडम, निलेश धर्माधिकारी सर यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व विद्यार्थिनींने मिळवलेल्या यशाबद्दल विद्यार्थिनींचे, शाळेचे, पालकांचे हार्दिक अभिनंदन यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मा.प्रा.गणेश करे पाटील, मुख्याधिकारी मा.सचिन तपसे, प्रशासन अधिकारी मा.अनिल बनसोडे, मुख्याध्यापक मा. दयानंद चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व सर्व पालक वर्ग यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE