तहसिलदार ठोकडे यांची आणखी एक मोठी कारवाई ; दोन जेसीबी तीन ट्रॅक्टर जप्त
करमाळा समाचार
गुळसळी तालुका करमाळा येथील यादोबा तलावाच्या परिसरात मुरूम उपसा करत असताना दोन जेसीबी आणि तीन ट्रॅक्टर वर तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे.

सदरची कारवाई आज दुपारी करण्यात आली. सदर ठिकाणी कोणत्याही परवानगीशिवाय जेसीबीच्या साह्याने मुरूम उपसा केला जात होता. यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे या संबंधित ठिकाणी पोहोचल्यानंतर जेसीबी व ट्रॅक्टरचे चालक-मालक पळून गेले आहेत. तर सर्व ट्रॅक्टर व जेसीबीच्या सह वाहने शिल्पा ठोकडे यांनी ताब्यात घेतले आहेत.
