करमाळ्यात युतीच्या तीनही पक्षांना नाकारले ; स्थानिक आघाडीचे सावंत विजयी
करमाळा समाचार

करमाळ्यात एकतर्फी विजयी साजरा करत शहर विकास आघाडीने विजय मिळवला आहे. तर नगरसेवकांच्या विजयातही शहर विकास आघाडीने बाजी मारली आहे. सदरच्या निवडणुकीमध्ये लक्षवेधी ठरलेल्या विक्रमसिंह परदेशी यांनी दोन्हीही जगताप गटाच्या मातब्बर उमेदवारांचा पराभव करीत विजय मिळवला. तर नगराध्यक्ष पदाच्या रेस मध्ये कमळ व शिवसेना हे पिछाडीवर पडले आहेत. संपूर्ण एकतर्फी विजय हा शहरी विकास आघाडीने मिळवला आहे.

करमाळा शहर विकास आघाडीचा नगराध्यक्ष तर वेगवेगळ्या प्रभागातून आठ नगरसेवक तर भाजपाचे सात नगरसेवक विजयी झाले आहेत. गतवर्षीच्या सत्ताधारी जगताप गटाला पाच जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामध्ये माजी नगराध्यक्ष वैभव जगताप यांचा पराभव हा मोठा पराभव मानला जात आहे.
शहरातील नागरिकांनी युती सरकारमधील तीनही गटांना या ठिकाणी पराभूत केल्याचे दिसले. भाजपा व शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट स्वतंत्र लढत असल्याचे दिसून आले होते. भाजपा व शिवसेना शिंदे गटाला पराभूत व्हावे लागले. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे शहरातून भाजप युती सरकारला नाकारल्याचं स्पष्ट दिसून येत आहे.

नगराध्यक्ष
भावना गांधी १२३
नंदीनी देवी जगताप ४५५७
सुनिता देवी ४८८०
वाघमारे – ७०
मोहिनी सावंत – ६५२० मते
प्रभाग – १
जबीन मुलाणी (S)
रवी जाधव (S)
प्रभाग २
संजय सावंत (S)
जोत्सना लुणीया (S)
प्रभाग ३
निर्मला गायकवाड (B)
पुजा इंदलकर (S)
प्रभाग ४
स्वाती फंड (B)
अतुल फंड (B)
प्रभाग ५
साजीदा कुरेशी (J)
विक्रमसिंह परदेशी (S)
प्रभाग ६
सुवर्णा अलाट (J)
प्रशांत ढाळे (J)
प्रभाग ७
अश्विनी अब्दुले (J)
युवराज चिवटे (J)
प्रभाग ८
सुनिता ढाणे (B)
दिपक चव्हाण (B)
प्रभाग ९
लता घोलप (B)
सचिन घोलप (B)
प्रभाग १०
संदिप कांबळे (S)
चैताली सावंत (S)

