करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

तहसिलदार ठोकडे यांचा आणखी एक झटका ; वाळुसह ट्रक ताब्यात

करमाळा समाचार

तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी अवैध वाळू उपसा विनापरवाना उत्खनन व मुरूम वाहतूक अशा विविध भागात सध्या कारवाईच्या धडाका सुरूच ठेवला आहे. काल रात्री जेऊर करमाळा रस्त्यावर एक वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला आहे. सिंघम अधिकारी म्हणून ख्याती असलेल्या ठोकडे यांच्या कारवाई मुळे वाळु माफिया आणि त्यांना सहकार्य करणाऱ्यांना हा मोठा झटका आहे.

तालुक्यात सध्या वाळू उपसा करणाऱ्यांवर तहसील विभागाची करडी नजर असल्याची दिसून आले आहे. मागील आठवड्यात करमाळा जातेगाव रस्त्यावर रात्री अडीचच्या सुमारास एक ट्रक श्रीमती ठोकडे यांनी पकडला होता. तर काल रात्री मौलाली माळ परिसरात एक ट्रक पकडून वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला आहे.

politics

आठवडाभरात वाळू, मुरूम असे दोन्ही मिळून जवळपास दोन ट्रक, दोन जेसीबी, तीन ट्रॅक्टर असे वाहन तहसील कार्यालयाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांच्यावर दंड आकारण्याची काम सुरू आहे. त्यातील एका ट्रकवर तीन लाख रुपयांचा दंड आकारलेला आहे.

या सर्व कारवायांमध्ये केवळ श्रीमती ठोकडे यांचा सहभाग दिसून येत आहे. त्या एकट्याच संबंधित ठिकाणी जाऊन छापा टाकतात व कारवाई करतात. मुळातच जे अधिकारी कार्यरत असतात त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी काही लोकांना पाठवले जाते. पण श्रीमती ठोकडे अचानकच कुठेही जातात. त्यामुळे सदरची कारवाई होण्यापूर्वी कोणालाच माहिती नसते. आपल्या भागात अशा प्रकारचे अवैध व्यवसाय होत असतील तर तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE