देवळालीत झालेल्या भांडणात गंभीर गुंह्यातील दोन संशयीतांना जामीन मंजुर
करमाळा समाचार
जुन्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीचे चुलते यांच्या घरात अनाधिकृत प्रवेश करून चाकूने, काट्याने, दगडांनी, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करीत दमदाटी केली. तसेच महिलेच्या अंगावरील कपडे फाडून तिचा विनयभंग केला व जखमी करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी देवळाली येथील दहा जणांवर गुन्हा दाखल झाला होता.

सदर घटना दिनांक 2 मे रोजी सायंकाळी चांदणी वस्ती, देवळाली येथे घडली होती सदर भांडणांनंतर 1) प्रमोद शिवाजी चांदणी 2) गणेश आजिनाथ अस्वले यांच्यावर करमाळा पोलीस स्टेशन मध्ये आयपीसी कलम 324,326,323,354,354A, 452,143,147,148,149,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर संशयीत आरोपींना अटक करून कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाकडून दोन दिवसाची पोलिस कस्टडी देण्यात आली.

त्यानंतर सदर आरोपींना सहा तारखेला कोर्टासमोर हजर केले असता त्यांना जामिनावर मुक्त केले व जामीन मंजूर केला. आरोपीतर्फे एडवोकेट भाग्यश्री मांगले -शिंगाडे व अमर अंगद शिंगाडे यांनी काम पाहिले.