लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात ; १८ ते ४४ मधील नागरीकांना ऑनलाईन बुकींग करुनच मिळणार लस
करमाळा समाचार
लसीकरणाचा दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून आता 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस पुरवठा केला जाणार आहे. परंतु केवळ पहिल्या फेरीत एक हजार लसी उपलब्ध झाल्या असून पाच दिवसांमध्ये प्रत्येकी दोनशे लसीप्रमाणे पाच दिवसात त्या संपवल्या जाणार आहेत. तर त्याची नोंदणी अधिकृत ऑनलाइन करावी लागणार आहे. त्यामुळे गर्दी न करता ऑनलाईन बुकिंग च्या दिवशीच उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

करमाळा तालुक्यासाठी आलेल्या एक हजार लसींचा पुरवठा आठ मे पासून दिला जाणार आहे. प्रत्येकी दोनशे लसी प्रमाणे एक हजार लसीचा कोटा पूर्ण केला जाणार आहे. सदरची लस प्राथमिक आरोग्य केंद्र कोर्टी या ठिकाणी दिली जाणार आहे. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केली आहे. त्यांचा त्याच दिवशी नंबर येईल व त्यांनी त्या ठिकाणी जाऊन घ्यायचे आहे अशा सूचना देण्यात आलेल्या आहे.
