सालसे येथे दि २ रोजी भव्य कुस्ती संकुलाचा भुमिपुजन समारंभ
करमाळा समाचार – विशाल घोलप
मौजे सालसे ता.करमाळा जि.सोलापूर येथे दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी मल्लसम्राट केसरी, अमृतसर केसरी पै.भरत भाऊ लोकरे यांच्या अर्जुनवीर हिंदकेसरी वस्ताद गणपतराव आंदळकर कुस्ती संकुलाचा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे.

करमाळा पूर्व विभागाचे दशरथ घाडगे तथा करमाळा आमदार संजयमामा शिंदे व हनुमान आखाडा पुण्याचे सर्वेसर्वा वस्ताद गणेशभाऊ दांगट व डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहारदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे. याकार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातील पैलवान, वस्ताद, कुस्ती शौकीन उपस्थित राहणार आहे.

सदर कुस्ती संकुलात सुसज्ज माती आखाडा, आंतरराष्ट्रीय दर्जाचे मॅट आखाडा, निवास व भोजन सोय, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक आदी सुविधा पै.भरत भाऊ लोकरे यांच्या संकल्पनेतून देण्यात येणार आहे. कुस्ती संकुलासमोर रनिंग ट्रॅक,फुटबॉल व बास्केटबॉल ग्राउंड,रस्सी पॉईंट,आधुनिक व्यायामशाळा आदी सुविधा देण्यात येणार आहेत. करमाळा पंचक्रोशीसह महाराष्ट्रभरातील पैलवानांसाठी सदर कुस्ती संकुल एक पर्वणी ठरणार आहे.