करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

मुळ कार्यकर्त्याना डावलुन मराठ्यांमध्ये राजकीयहेतुने घुसखोरी ; सभांवर परिणाम

करमाळा समाचार

करमाळा तालुक्यात मूळ आंदोलनकर्ते ज्यांनी कायम मराठा समाजाच्या हितासाठी स्वतःचे नाव पुढे कधी न करता आंदोलने व प्रश्न मांडले अशा समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांना डावलून राजकारण डोक्यात ठेवून काहीजण पुढे येऊन काही कार्यकर्त्यांच्या जोरावर समाजाचेकर्ते असल्याचे दाखवून समाजाचे नेतृत्व करू पाहत आहेत. यामुळे त्यांचा हेतू स्पष्ट नसल्याने किंवा त्यावर संशय घेतला जात असल्यामुळे जरांगेंच्या सभेकडेही लोकांनी पाठ फिरवल्याचे करमाळा तालुक्यातून दिसून आले आहे.

मुळातच मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनात सुरुवात केल्यानंतर कोणत्याही ओळखी शिवाय गावोगावी मराठा समाजातील प्रत्येक कार्यकर्ता जो चळवळीत काम करत होता तो प्रत्येक जण जरांगे यांच्या सोबत आपसूकच जुडला. त्यामुळे वेगळी ओळख आणि संपर्क करण्याची गरज भासली नाही. पण याचा फायदा उचलत काही लोक हे जरांगे यांना जाऊन मिळाले आणि तेच समाजाचे कैवारी असल्याचे दाखवू लागले. यातून जरांगे यांच्या सोबत झालेला संपर्क त्याचा लाभ उचलत गावोगावी आम्हीच त्यांच्या जवळचे कार्यकर्ते असल्याचे भासवत आहे.

यामुळे बराचसा मराठा समाज दुखावला गेल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात आजपर्यंत दोन वेळा जरांगे पाटील यांची सभा झाली परंतु दोन्ही वेळे सभा यशस्वी झाली नसल्याचे दिसून आले. महाराष्ट्रभर ज्या व्यक्तीची उपस्थिती असेल तिथे लक्षणीय गर्दी होते त्याच नेत्याला करमाळ्यातून मात्र पाहिजे तितका प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले. यामध्ये चुकीच्या लोकांनी स्वतःची जाहिरात करून आपणच समाजाचे नेते असल्याचे दाखवणे हे कारण असू शकते. शिवाय कोणालाही विश्वासात न घेता मुख्य ठिकाणी वगळून कुठेतरी भलत्याच ठिकाणी सभांचे नियोजन करणे असेही असू शकते.

तालुक्यातून अद्याप कोणताही व्यक्तीला मराठा समाजाचा नेता म्हणून कोणीही जाहीर केलेले नाही. लोकसभा निवडणुका तसेच येणाऱ्या काळातील निवडणुकांमध्ये मराठा समाज आपल्याला सहकार्य करेल ही भावना डोक्यात ठेवून कोणी जर आपले काही कार्यकर्ते गोळा करून त्यांच्या माध्यमातून उमेदवारी जाहीर करत असतील तर त्यांनाही समाज त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असे मत मराठा समाजातील कार्यकर्त्यांकडून व्यक्त होऊ लागले आहे.

मुळातच जरांगे यांच्या पाठीशी उभा असलेला समाज हा राजकारण विरहित नेतृत्व मिळालेले असल्याने उभा राहिला होता. काही दिवसांपासून जरांगे यांचे राजकीय पक्ष सोबत संबंध वाढत चाललेले आहेत हेही समाजातील लोकांना खटकत आहे. त्यामुळे त्याचे पडसाद कशा पद्धतीने उमटतात हे येणारा काळ ठरवेल. परंतु जरांगे यांनी या राजकारणांपासून अलिप्त रहावे अशी विनंती सामान्य मराठ्यांकडून केली जात आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE