E-Paperसाहित्यसोलापूर जिल्हा

भरकटत जात आहेत अल्पवयीन मुले-मुली- ऑनलाईन अभ्यास आणि पालकांची वाढती चिंता

पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी सोशल मीडिया चा अतिरेक आता आपणच पालकांनी रोखायला हवा. ही खरी काळाची गरज वाटते.

©️®️🖋️ अंजली श्रीवास्तव करमाळा.
(लेखिका वक्ता आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत)

 

गेल्या वर्षभरापासून ऑनलाईन अभ्यासक्रम शिक्षण पध्दती आपण राबवत आहोत.ही काळानुसार बदलत जाणारी गोष्ट असली तरी जास्त प्रमाणात ती लादलेली गोष्ट आहे स्वीकारलेली गोष्ट आहे.
कोरोना सारख्या महामारीत ही शैक्षणिक पध्दत आपण स्वीकारली असली तरी ती एक काळीज वाहू गोष्ट ठरत आहे हे नक्की.

आज मुलांना फोन पासून दूर ठेवणारे आपण जागरुक पालक मुलांना स्मार्ट फोन विकत घेऊन देवू लागलो ते त्यांच्या भवितव्यासाठी.अभ्यासासाठी. पण..याच गोष्टी आज चिंतेची बाब ठरत आहेत.

अभ्यासक्रम हाताळताना युट्यूबवर ,गुगलवर , फेसबुकवर नको त्या गोष्टी त्यांना पहावयास मिळत आहेत.तसेच एकीकडे मैत्री चे प्रमाण आणि संपर्क या गोष्टी कधी नव्हे त्या खूप सहजरित्या सोप्या ठरत आहेत. यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागात ही अल्पवयीन मुले-मुली प्रेमप्रकरणात फसत चालली आहेत.मुली घरातून पळून चालल्या आहेत.या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस स्टेशनसह आपण पालक म्हणून आपली जबाबदारी काय आहे ?याचा ही अभ्यास होणे खरंच गरजेचं झाले आहे.

परिवर्तन संसार का नियम है.
यानुसार बदलावं ही लागतं.आपला पाल्य कुठं कमी पडू नये म्हणून पालक त्यांच्या भल्यासाठी वाट्टेल ते करतात.त्यांना हव्या त्या गोष्टी आणून देतात.या गोष्टी कौतुकास्पद आहेत ही.

पण आपला पाल्य खरच अभ्यास करतो का? की नको त्या गोष्टीत तो गुंतत चाललाय! या गोष्टीवर आता पालकांनी नजर , लक्षआणि नियंत्रण ठेवणे आवश्यक आणि गरजेचे आहे.

कारण अभ्यासाच्या नावाखाली मुले निश्चितच वाम मार्गाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.या वरवर वाटणार्या बाबींना गुन्हेगारी चे वाढते रुप येण्याची आपण वाट पाहू नये असे वाटते. यासाठी अभ्यासा व्यतिरिक्त मुलांना फोन न देणे.याची कटाक्षाने अ़ंमलबजावणी करावी.
स्मार्ट फोन मुळे ओळख , मैत्री संभाषण खूप वेगाने होत आहे.

अल्पवयीन मुले-मुली चं इथं भरकटत जाणं मग आपण रोखू शकत नाही.शकणार नाही.
अभ्यासाच्या नावाखाली अल्पवयीन मुले-मुली प्रेमप्रकरणाच्या जाळ्यात सहजपणे अडकत फसत चालली आहेत.अमिषाला बळी ठरत आहेत.वर्तमान पत्रात रोज अनेक बातम्या आज अल्पवयीन मुले-मुली पळून गेल्याच्या निदर्शनास येत आहेत.
पालक आणि समाजासमोर या बाबी वाढत्या चिंतेच्या ठरत आहेत..

यासाठी पालक आणि मुलांमधील संवाद आज वाढणे गरजेचे वाटते. या विषयावर मी पोलिस निरीक्षक मा.कोकणे सरांशी संवाद साधला असता त्यांनी ही आपले मनोगत इथे व्यक्त केले.

(समाजाला काळानुरूप बदलत जावे लागते.तो बदल ही आपण स्विकारतो.
आज स्मार्ट फोन च्या माध्यमातून शिक्षण पध्दती आपण सहजपणे स्वीकारली पण आपला पाल्य या फोन चा सही वापर करतोय का हे पाहणं गरजेचे आहे.फोन सारख्या माध्यमातून फक्त वाईटच गोष्टी शिकता येतात असे नाही तर तो आपण कोणत्या कामासाठी वापरतोय यावर बर्याचशा गोष्टी अवलंबून असतात. पालकांना एक विनंती की मुलांवर कुठल्याही गोष्टी लादू नका.त्यांच्या कलेने त्यांना समजून घेणे आज गरजेचे वाटते. नाण्याला दोन बाजू असतात. हे लक्षात घेऊन स्मार्ट फोन असो किंवा गुगलवर सर्च करणे असो या गोष्टींचा उपयोग हा वैचारिक, शैक्षणिक गोष्टी साठी आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी असतो .हे एवढे पाल्यांच्या लक्षात आले की वाढत्या गुन्हेगारीला आपसूकच आळा बसेल. पालकांनी जागरूक राहण्याची गरज आहे असे वाटते.
– मा. सुर्यकांत कोकणे
पोलिस निरीक्षक.करमाळा.)

 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE