तहसिल कार्यालया बाहेरील शासकीय योजनेच्या फलकावरील नेत्यांच्या चेहऱ्यावर काळे
करमाळा समाचार
मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे पाटील यांनी उपोषणाला बसले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी करमाळा तालुक्यातही साखळी उपोषण करण्यात येत आहे. दरम्यान मराठा कार्यकर्त्यांकडून बस स्थानकामध्ये बस वर असलेल्या नेत्यांच्या फोटोवर काळे फासण्यात आले होते. तर आता तहसील कार्यालय येथे अनोळखी कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री व इतर नेत्यांच्या फोटोवर काळे फासले आहे.

मागील पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषण करीत आहेत. तरी त्यांच्याकडे शासन लक्ष देत नाही. त्यामुळे मराठा समाज आक्रमक होत चालला आहे. मागील दोन दिवसांपासून गावबंदी नंतर मराठा समाजाने तीव्र स्वरुप घेतले आहे. बस स्थानकानंतर आता तहसील बाहेर लावलेला शासकीय बोर्डवर ही अज्ञातांकडून काळे फासण्यात आले आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांचे फोटो आहेत.

तर उद्या जेलभरो आंदोलन …मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मागील पाच दिवसांपासून पाणी न घेता उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडत चालली आहे. तर युवक स्वतःच्या जीवाचे बरे वाईट करत आहेत. तर विद्यार्थी व युवकांवर महाराष्ट्रात गुन्हे दाखल केले जात आहेत. याचा निषेध म्हणून उद्या करमाळा येथे जेलभरो आंदोलन केले जाणार आहे.