करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एकत्र येण्याचे आवाहन

करमाळा | प्रतिनिधी

धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सकल धनगर समाज, करमाळा यांच्या वतीने सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता करमाळा तहसील कार्यालय येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. या वेळी तालुक्यातील सर्व धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसह समाजाच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे निवेदन देण्यात येणार आहे. तसेच श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टसाठी स्वतंत्र शासकीय कायदा, ट्रस्टमध्ये धनगर समाजाचा प्रभावी सहभाग आणि लोणावळा येथील कनेक्टिंग लिंकला हुतात्मा वीर शिंगोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे, अशा मागण्याही निवेदनाद्वारे करण्यात येणार आहेत.

धनगर समाजाच्या मागण्यांसाठी पक्ष, संघटना व गट-तट बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. हा लढा केवळ आरक्षणाचा नसून हक्क, स्वाभिमान आणि अस्तित्वाचा लढा असल्याची भूमिका समाजाच्या वतीने मांडण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी सोमवारी सकाळी ११ वाजता करमाळा तहसील कार्यालयावर उपस्थित राहून निवेदन देण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन सकल धनगर समाज करमाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE