करमाळा येथे कोविड-19 कक्ष (वाॅर रूम ) तयार
प्रतिनिधी- करमाळा समाचार
कोविड-19 कक्ष (वाॅर रूम ) करमाळा शहर आणि तालूक्यातील सर्वांसाठी तहसील कार्यालय करमाळा येथे कोविड-19 कक्ष (वाॅर रूम ) तयार करणेत आला आहे. सदर नियंत्रण कक्षामध्ये कोरोनाचे अनुषंगाने आपणास हवी असलेली माहिती उपल्ब्ध होईल अशी माहीती तहसिलदार समीर माने यांनी दिली.

सदर माहिती मध्ये रूग्णवाहिका, दवाखान्यामध्ये उपल्ब्ध बेड, डाॅक्टरांचे नाव फोन नंबर, ऑक्सीजन उपल्ब्ध असणारे बेड,bकोविड केअर सेंटर इत्यादि संबंधी माहिती आपणास मिळू शकते.सदर ठिकाणी संपर्काचा क्रमांक 02182-220357 आहे. सदरची कोविड -19 वाॅर रूम ही 24 तास सुरू असेल.
