करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

चोरट्यांनी चोरीची पध्दत बदलली ; खाजगीसह आता शासकीय मालमत्तेवर डल्ला

चिखलठाण (प्रतिनिधी)

उमरड ता करमाळा येथील शेतातील विद्युत ट्रांसफार्मर मधील तीस ते चाळीस हजार रूपये किमतीच्या साहित्याची चोरी झाली असून त्याचा तपास लावण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
उमरड तालुका करमाळा येथील नितीन भारत मध्ये यांच्या शेतात असलेल्या शंभर एचपी क्षमतेच्या विद्युत ट्रान्सफॉर्मर मधील ऑइल ॲल्युमिनियम कॉइल व इतर साहित्याची आज्ञात चोरट्याने बुधवारी रात्री आठची लाईट गेल्यानंतर चोरी करून ट्रांसफार्मर वरून फेकून दिला आहे. ट्रांसफार्मर पोलवरून खाली पडल्याने ट्रांसफार्मर बॉडीचेही नुकसान झाले आहे.

सध्या तालुक्यात अशा प्रकारच्या चोरीचे प्रकार होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. उमरड येथे ट्रांसफार्मर साहित्याच्या झालेल्या चोरीचा तपास लावण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे . चोरीनंतर महावितरण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन त्याचा पंचनामा केला असून पुढील कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवत असल्याचे सांगितले आहे.

यापूर्वी या भागातील विद्युत मोटारी केबल स्टार्टर अशा शेती साहित्याची चोरी होत होती. परंतु सध्या ट्रांसफार्मर मधील साहित्याचीही चोरी होऊ लागल्याने शेतकऱ्यांमधून या चोऱ्यांना कायमचा पायबंध घालण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली जात आहे.

 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE