शिवसेनेच्या मोठ्या नेत्याच्या पत्नीला ईडी ची नोटीस
करमाळा समाचार
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. पीएमसी बँक प्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नुकतंच ईडीने समन्स बजावलं आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी हे समन्स बजावल्याची माहिती मिळत आहे. यानुसार येत्या 29 डिसेंबरला ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
