पीएमश्री. साधनाबाई जगताप मुलींच्या शाळेत बाल आनंदी बाजार उत्साहात संपन्न
करमाळा समाचार

करमाळा नगरपरिषद अंतर्गत पीएमश्री. साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथमिक मुलींची शाळा नंबर १,करमाळा येथे विद्यार्थिनींच्या सृजनशीलतेला व कौशल्याला वाव देणारा ‘बाल आनंदी बाजार’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष मा.श्री. अतुलभैय्या फंड,सावंत गटाचे नेते नगरसेवक मा. श्री.संजय (अण्णा) सावंत, यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. गणेश करेपाटील सर, शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी मा.श्री. अनिल बनसोडे साहेब, नगरसेवक मा.श्री. विक्रमसिंग परदेशी, नगरसेविका सौ.स्वातीताई फंड,नगरसेविका सौ. अश्विनी अब्दुले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या बाजारामध्ये भाजीपाला,फळे,तसेच विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या खाद्यपदार्थांचे, हस्तकलेच्या वस्तूंचे, शैक्षणिक साहित्याचे स्टॉल्स लावून खरेदी-विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये स्वावलंबन, आर्थिक व्यवहाराचे ज्ञान, डिजिटल व्यवहार ज्ञान,संघभावना व उद्यमशीलता विकसित होत असल्याचे मान्यवरांनी आपल्या भाषणात नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती संध्या शिंदे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. रमेश नामदे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक श्री. दयानंद चौधरी सर व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. निर्मला फंड यांच्या मार्गदर्शनाखाली उपअध्यक्षा सौ.आम्रपाली कांबळे, शिक्षणतज्ज्ञ सदस्य सौ. माधुरी पवार,दिपाली बोकन सर्व सदस्य तसेच शिक्षकवृंद सौ. सुनीता क्षीरसागर, सुवर्णा वेळापुरे, सौ. मोनिका चौधरी,श्रीमती तृप्ती बेडकुते,श्री निलेश धर्माधिकारी, श्रीमती भाग्यश्री पिसे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या बाल आनंदी बाजारातुन जवळ पास एक ते दीड लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याची माहिती मुख्याध्यापक श्री.दयानंद चौधरी सर यांनी सांगितली या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या आर्थिक व्यवहार ज्ञानात वाढ होण्यास मदत होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी शाळेने केलेल्या प्रयत्नाबद्दल मान्यवर,पालक व नागरिकांकडूनही कार्यक्रमाचे, शाळेचे विशेष कौतुक करण्यात आले.

