करमाळ्यात वन्यजीव तस्करी प्रकरणी चार जणांवर गुन्हा ; वांगी, कोंढेज, जेऊर परिसरातील युवकांचा समावेश
करमाळा समाचार

मागील अनेक दिवसापासून करमाळा तालुक्यात वन्य प्राण्यांची तस्करी होत असल्याबाबत पोलिसांना कुणकुण होती. पण ठोस पुरावे म्हणून येत नव्हते. पण खात्रीलायक मिळालेल्या माहिती नंतर करमाळा पोलिसांनी जेऊर शेलगाव रोडवर छापा टाकून एक जनाला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडील मांडूळ ताब्यात घेण्यात आले आहे.

करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, सहाय्यक पोलीस भुजबळ, पोलिस नाईक निंबाळकर व मनिष पवार यांच्या कडे एक माहिती मिळाली की, जेऊर शेलगाव रस्त्यावर रोडच्या कडेला महांडूळ व्यवहार होणार आहे. त्यानंतर पोलिसांनी लागलीच घटनास्थळाला भेट देण्यासाठी निघाले. ठिकाणापासून एक किलोमीटर अंतर अलीकडेच आपली गाडी थांबवून चालत त्या दिशेने गेले व ज्या ठिकाणी हा व्यवहार होणार होता. त्या ठिकाणाहून सुभाष आरकिले वांगी नं. 1, सागर बोराडे कोंढेज, अतुल हजारे, जेऊर, तात्या पाटील, कोंढेज यापैकी एक जण मिळुन आला इतर पळुन जाण्यात यशस्वी झाले. त्यावेळी त्यांच्याकडे एक लाखाचे म्हांडुळ मिळुन आले आहे.
यासारखी अनेक गुन्हे मोठ्या शहरांमध्ये घडत असतात. पण त्याचे लोण आता ग्रामीण भागाकडे पसरलेले असून ग्रामीण भागातील ही अनेक युवक यांच्या नादी लागून आपले आयुष्य बरबाद करून घेत आहेत. त्यांना एक वेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून यातून काहीतरी पैशाची कमाई केली जाते असे चित्र समोर उभे केले जाते. पण वास्तविक पाहता तसे काही घडत नाही अशा काहीच मोजक्या वस्तू आहेत की ज्याने काहीतरी बदल घडतात त्याला शास्त्रीय कारण असल्यामुळे ते बदल घडत असतात. पण या युवकांना जादू-टोणा करून हे बदल घडून आणू असे भरकटले जाते. त्यामुळे अशा वन्य जीवांची तस्करी करून ते विक्रीस आणले जातात.
