करमाळासोलापूर जिल्हा

पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुभाष चौक येथे पेढे वाटुन वाढदिवस संपन्न ; कार्यकर्त्यांसह नागारीकांच्या मोठया उपस्थितत कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी सुनिल भोसले

करमाळा सुभाष चौक येथे मकाईचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब झाझुर्णें यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शिवराज जगताप यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेऊन कोरोनाचे पालन करून शासनाने नियम व अटी घालून दिलेल्याच पालन करून आॅनलाईन पध्दतीने कार्यक्रमाचे आयोजन केले.

यावेळी पवार साहेबानवर व पक्षावर निष्ठा असणारे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. करमाळा शहरातील व तालुक्यातील फक्त पक्षावर व पवार साहेब यांच्या वर प्रेम करणारे कार्यकर्ते सुभाष चौक येथे शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आले होते.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सुधाकर लावंड, राष्ट्रवादी शहरध्यक्ष शिवराज जगताप, शिवसेना नेते महेश चिवटे, आदिनाथ कारखान्याचे व्हा.चेअरमन रमेश कांबळे, काॅग्रेसचे नेते सुनील सावंत, शिवसेना शहरप्रमुख प्रविण कटारिया, राष्ट्रवादी युवा नेते गौरव झाझुर्णें, नितिन झिंजाडे, राष्ट्रवादीचे अरूण टागडे, आझाद शेख, शिवाजी जाधव, संजय शिंदे, हनुमंत माढरे, अश्पाक जमादार , ओंकार पलगें, केतन कांबळे, समीर शेख, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिवराज जगताप म्हणाले, करमाळा तालुक्यात गटबाजी किंवा धुसफूस नाही स्वार्थी राजकारण करणारे गैरसमज पसरवतात कार्यकर्ते मध्ये संभ्रम निर्माण केला जातो. राष्ट्रवादी मध्ये काम करणारे निष्ठावंत आहेत. राष्ट्रवादी मधील कार्यकर्ते फक्त समाजसेवा करतात पक्षाचा स्वार्थासाठी उपयोग करणारे उघडे पडतात असे जगताप म्हणाले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE