करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

गोविदपर्व बाबतच्या आरोपांवरुन प्रा. झोळ यांचे प्रतिउत्तर

करमाळा समाचार

ज्या पद्धतीने मी आरोप करताना एखाद्या आरोपावर कागदपत्रे सादर करू शकतो. त्याच पद्धतीने विरोधकांनीही आरोप करताना माझ्याबाबत केलेल्या वक्तव्यावर कागदपत्र असतील तरच बोलावे राजकारणात बिनबुडाचे आरोप करणाऱ्याला काही किंमत नसते. आपल्याला ते पटतही नाही. त्यामुळे माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी कागदोपत्री सिद्ध करावे अन्यथा मी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे असे प्रतिउत्तर प्रा. रामदास झोळ यांनी दिले आहे.

मकाई सहकारी साखर कारखाना निवडणुकीदरम्यान सत्ताधारी व विरोधकांनी कडून वेगवेगळे आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यामध्ये सुरुवातीपासूनच बागल गटावर होणाऱ्या आरोपांना मध्यंतरी मकाई सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब पांढरे यांनी उत्तर दिले होते. तर आज पश्चिम भागाचे बागल गटाचे कट्टर समर्थक गणेश झोळ यांनी प्राध्यापक रामदास झोळ यांच्यावर आरोप करताना गोविंदपर्वचा विषय काढला होता. यावरून आता प्रा. झोळ यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

तर आपण आता सक्रिय राजकारणात आलो असलो तरी विरोधकांनीही बोलताना थोडे भान ठेवणे अपेक्षित आहे अशी अपेक्षा यावेळी झोळ यांनी व्यक्त केली. गोविंदपर्व बाबत आपला कसलाही संबंध नसल्याचे प्राध्यापक जवळ यांनी सांगितले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE