राजकारणात कोण कोणा सोबत कायमचा नांदलाय का ? ; मा. आ. पाटील यांचे सुचक व्यक्तव्य
करमाळा समाचार
तालुक्याच्या राजकारणात सध्या खळबळ सुरु असुन कोरोना नंतर सगळेच गट सक्रिय झाले आहेत. कोरोनात सक्रिय नव्हते असे नाही. पण राजकारण ढवळुन निघण्या कारनाने राजकारण ढवळुन निघणार आहे असे दिसुन येत आहे. काल माजी आमदार नारायण पाटील यांच्या वक्त्यव्यामुळे येणाऱ्या राजकारणात कोण कोणासोबत जाईल हे सांगु शकत नाही असे पाटील म्हणाल्याने बागल गटासोबत युतीचे सुचक विधान मानले जात आहे.

युतीबाबत बोलताना सुरुवातीला तरी मा. आ. पाटील यांनी थेट नकार दिला पण नंतर स्वतःच आपल्या विधानात बदल केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “राजकारणात कोण कोणा सोबत कायमचा नांदलाय का? राजकारणाची दिशा बघुन समीकरणे ठरवावी लागतात. चलती का नाम गाडी जिथ स्टेशन येईल तिथ थांबायचे तिथुन आपल्या गावी जायचे, हे चालतच रहायच. त्यामुळे युती करण्यावर आज भाष्य करणे घाईचे ठरेल ,सर्वांचा विचार घेऊन योग्य तो निर्णय घेवु” म्हणुन यावरुन असे दिसतेय की पाटील गट सध्या तरी बागलांसोबत जाण्याचा विचार करत नाही पण कधी काय होईल सांगताही येत नाही असे दिसुन येते.

येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाटील बागल युती निर्णायक होऊ शकते. त्यामुळे त्यापुर्वी शहराच्या राजकारणात काय बदल होतात का ? यावर दोघांची युती अवलंबुन आहे. पण सध्या राजकारणात पाटील गट तालुक्यात आघाडीवर असल्याने युती बाबत ते कसलाही विचार सध्या करत असतील असे दिसत नाही.