E-Paperकरमाळा

करमाळ्यात झाडबुके महाविद्यालयात जेसीबी ग्राहक मेळावा उत्साहात; जेसीबी ऑपरेटर प्रशिक्षणाला मोठा प्रतिसाद

करमाळा –

बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचलित झाडबुके महाविद्यालय बीसीए करमाळा येथे, लोकनेते भाऊसाहेब झाडबुके चॅरिटेबल ट्रेनिंग सेंटर करमाळा आणि सिद्धार्थ ऑटो पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात सिद्धार्थ ऑटोचे जनरल मॅनेजर श्री. मनीष तीरडालकरसाहेब यांनी नवीन वेगवेगळ्या जेसीबी मशीनच्या माॅडेलची कार्यप्रणाली, त्याची देखभाल, कार्यक्षमता वाढविण्याचे मार्ग, इंधन खर्च नियंत्रण आणि कामाच्या प्रकारानुसार योग्य मशीनची निवड याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

संस्थेच्या मा.संचालिका व खजिनदार सौ.वर्षाताई ठोंबरे यांच्या कुशल नेतृत्व व मार्गदर्शना अंतर्गत लोकनेते भाऊसाहेब झाडबुके चॅरिटेबल ट्रेनिंग सेंटर प्रगती पथावर वेगाने मार्गक्रमण करित आहे असे समन्वयक श्री. हमीद काझी यांनी सांगितले. या पुढे बोलताना करमाळ्यातील जेसीबी ऑपरेटर प्रशिक्षण केंद्रामुळे ग्रामीण भागातील बेरोजगार, गरीब आणि होतकरू युवकांना रोजगाराची नवी दिशा मिळत आहे. प्रशिक्षणाचा कालावधी, आवश्यक कागदपत्रे, IESC परीक्षा आणि जेसीबी कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या OTC कार्ड याबाबत त्यांनी माहिती दिली.

तसेच सोलापूर जिल्हा RTO मार्फत माफक शासकीय दरात Heavy Equipment Driving Licence मिळवून देण्याची सुविधा या केंद्रातच उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक 18 वर्षांवरील तरुणांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कुशल ऑपरेटरांना रोजगाराच्या संधी देण्याचे आवाहनही त्यांनी जेसीबी मालकांना केले.

करमाळ्यातील या केंद्रात पुढील महिन्यात पोकलेन ऑपरेटर प्रशिक्षण सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली. परिसरातील बीसीए महाविद्यालय व इंग्लिश मीडियम स्कूलचा लाभ घेण्याचे आवाहनही करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी बीसीए महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. अतुल ढवळे यांनी आभार प्रदर्शन करतानां महाविद्यालयाची वैशिष्ट्ये, बीसीए कोर्सचे महत्त्व आणि प्रवेश प्रक्रियेची माहिती दिली.

या प्रसंगी जेसीबी कंपनीतर्फे जेसीबी मालकांना भेटवस्तू, तर बीएसपीएम–एलबीसीटीतर्फे फोल्डर, लेटरपॅड आणि पेन देण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप स्नेहभोजनाने करण्यात आला.

या कार्यक्रमाला बीसीए महाविद्यालय, इंग्लिश मीडियम स्कुल, लोकनेते भाऊसाहेब झाडबुके चॅरिटेबल ट्रेनिंग सेंटरचे कर्मचारी, विद्यार्थी तसेच सिद्धार्थ ऑटो सोलापूरचे श्री. अंबाजी कट्टा, श्री. आनंद कुरले , श्री अमोल बारकुल ,श्री मंगेश भंडारे,श्री जिशान कबीर तसेच पुणे येथील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE