करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळ्यात सर्वात मोठा निषेध मोर्चा आणि सरकारला बांगड्यांचा आहेर ; अंगावर शहारे आणणारे मुलींचे भाषण

करमाळा समाचार

सकल मराठा समाजाच्या वतीने आज करमाळा येथे निषेध करण्यासाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात जवळपास पाच ते दहा हजार कार्यकर्ते सहभागी झाले. सदरचा मोर्चा आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा करमाळातून काढण्यात आला. यादरम्यान विविध संघटना पक्ष व गटातटांनी या मोर्चात पाठिंबा देत सहभाग नोंदवला होता. विशेष म्हणजे सदरच्या मोर्चात शासनात असलेल्या पक्षातील पदाधिकारी ही उपस्थित राहिले होते. यावेळी निषेध व्यक्त करण्यासाठी करमाळा येथील रनरागिणींच्या हस्ते शासनाला बांगड्यांचा आहेर देण्यात आला.

सकाळी दहा वाजता या मोर्चाला सुरुवात झाली. गावागावातून लोकांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली होती .परिसरातील महिला व लहान मुलांनीही या मोर्चात सहभाग नोंदवला. हजारोंच्या संख्येने सर्व महात्मा गांधी पुतळा येथे जमा झाले होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास सदरच्या मोर्चाला सुरुवात झाली. विविध संघटना पक्ष व गटातटाचे नेते उपस्थित होतेच शिवाय वेगवेगळ्या समाजाच्या कार्यकर्त्यांनी ही सदर मोर्चात सहभाग नोंदवला.

हजारोंच्या संख्येत उपस्थित असलेल्या जनसमुदायाने अगदी शांततेत सदरचा मोर्चा सुरुवात केली. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत सदरचा मोर्चा शासनविरोधी घोषणा देत पुढे सरसावत होता. यावेळी लहान मुलांसह महिलांनी आक्रमक व घोषणा देत समोर जात होते. त्यानंतर राशिन पेठ मार्गे सदरचा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ पोहोचला या ठिकाणी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चा तहसीलच्या दिशेने जात होता. यावेळी मोर्चा मोठ्या संख्येने कार्यकर्ते वाढताना दिसत होते.

आयोजकांच्या वतीने योग्य वाहतूक व्यवस्था व पार्किंगची सोय करण्यात आल्यामुळे कोणत्याही प्रकारची धांदल दिसून आली नाही. एकाच वेळी सर्व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने तहसीलच्या दिशेने पोहोचत होते. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पण त्यांची एवढी गरज भासली नाही. अगदी नियंत्रित अशा पद्धतीने मोर्चा हा तहसील आवारात पोहोचला. या ठिकाणी करमाळ्याच्या पाच रणरागिणींनी भाषणे केली . आपली मनोगत व्यक्त केले उपस्थित आमच्या अंगावर शहारे आणणारे हे भाषण ऐकून प्रत्येकाने टाळ्यांच्या गजरात सर्वांचे स्वागत केले.

सकल मराठा समाजाच्या वतीने उपस्थित कार्यकर्त्यांना पाण्याचे नियोजन केले होते. त्याशिवाय शहरातील मुस्लिम समाजानेही तहसील परिसरात पाणी वाटून सहभाग नोंदवला. मोर्चा च्या अंतिम टप्प्यात मुलींची भाषणे पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी निवेदनात काय आहे ते वाचून दाखवले व विविध मागण्या बोलून दाखवल्या. त्यानंतर प्रांताधिकारी यांच्याकडे सरकारसाठी निषेध म्हणून बांगड्यांचा आहेर पाठवण्यात आला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE