करमाळाक्रिडामाढासोलापूर जिल्हा

आमदार संजयमामा शिंदे यांच्या सुपुत्राची दैदिप्यमान कामगिरी

प्रतिनिधी


राजस्थान येथील जयपूर येथे सुरू असलेल्या 31 व्या ऑल इंडिया जी. व्ही. मावलकर शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्र राज्याकडून प्रतिनिधित्व करणारे निमगाव टे ता. माढा चे सरपंच, विठ्ठल कार्पोरेशन लि. म्हैसगावचे कार्यकारी संचालक व आ. संजयमामा शिंदे यांचे सुपुत्र यशवंत शिंदे यांनी सुवर्णपदक पटकावले आहे .

यशवंत भैय्या शिंदे यांनी सिंगल ट्रॅप इव्हेंट मध्ये 50 पैकी 44 गुण मिळवून सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. जयपूर येथे सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यासह पंजाब, हरियाणा, गुजरात, दिल्ली, उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, गोवा या प्रमुख राज्यांसह देशातील विविध राज्यातील 300 स्पर्धक सहभागी झाले आहेत.

यशवंत भैय्या शिंदे यांना सिद्धार्थ पवार यांचे मार्गदर्शन लाभले. यशवंत भैय्या शिंदे यांनी सुवर्णपदक मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन माढा मतदारसंघाचे आ. बबनदादा शिंदे, करमाळ्याचे आ. संजयमामा शिंदे, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजिततसिंह शिंदे, पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह शिंदे, धनराज दादा शिंदे यांसह अनेक मान्यवरांनी यशवंत भैय्या शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.

politics
DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE