मकाई निवडणुक – दुसऱ्यांदा घेतलेली सुनावणी पुर्ण ; पण निकाल आज नाही लागणार
करमाळा समाचार
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उच्च न्यायालयापर्यंत गेलेल्या उमेदवारांना आता पुन्हा एकदा निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोंपे यांच्याकडे सुनावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आज सर्वांचे सुनावणी तहसील कार्यालय करमाळा येथे पार पडली. सदर सुनावणी वरील निकाल आज जाहीर होणार नसून सोमवार पर्यत याचा निकाल लागेल अशी शक्यता आहे. निकाल काय येतोय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

आता पुन्हा एकदा निकाल तपासून त्यावरील निर्णय घेण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. तब्बल 21 उमेदवारांचे निकाल यावर अवलंबून आहेत तर निकाल नेमका कोणत्या बाजूला लागेल याची उत्सुकता सर्वसामान्य लोकांना लागून राहिले आहे. निकालावर निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे. यापूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व अर्ज अपात्र ठरवले होते. आता तेच अर्ज पुन्हा एकदा सुनावणी झाल्यानंतर पात्र ठरवतील की अपात्र याकडे लक्ष लागून राहणार आहे. यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेला निर्णय कायम ठेवतात या यात बदल होतोय, स्वतःचा निर्णय स्वतः बदलतात यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
