करमाळा फार्मर्स क्लब तर्फे मायक्रोसन बायोप्लांट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा गौरवपूर्ण सन्मान
करमाळा समाचार
शेती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मायक्रोसन बायोप्लांट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या प्रतिष्ठित कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (MD) श्री. हरेकृष्ण पोथिना यांना “उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्कार – २०२५” देऊन करमाळा फार्मर्स क्लब तर्फे सन्मानित करण्यात आले. टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाद्वारे दर्जेदार, रोगमुक्त व उच्च उत्पादनक्षम G9 केळी रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत मायक्रोसन कंपनीने कृषी क्षेत्रात केलेल्या मोलाच्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमास करमाळा फार्मर्स क्लबचे कार्याध्यक्ष श्री. योगेश देवकर, सचिव श्री. गणेश माने, मार्गदर्शक संचालक श्री. शिवशंकर जगदाळे तसेच प्रगतशील केळी बागायतदार श्री. सतीश टांगडे यांच्यासह करमाळा तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमास मायक्रोसन कंपनीचे वरिष्ठ अधिकारी श्री. रवींद्र राजू आणि श्री. सुरेश अण्णाही उपस्थित होते.
या सन्मानामुळे शेतकरी आणि कंपनी यांच्यातील आपुलकीचे नाते अधिक दृढ झाले असून, भविष्यातील शेती प्रगती, उत्पादनातील गुणवत्ता आणि शाश्वत शेती तंत्रज्ञानाच्या दिशेने हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार आहे.

