जिल्ह्यातील अर्धवेळ परिचारिकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे खासदार सुप्रियाताई सुळे व प्रदेशाध्यक्ष रुपाली ताई चाकणकरांचे आश्वासन.-तृप्ती साखरे
करमाळा समाचार
आरोग्य क्षेत्रात आशा कर्मचारी, गट प्रवर्तक व अर्धवेळ परीचर सेविका अत्यंत तळमळीने काम करताना दिसतात.करमाळा तालुक्यात जवळपास ३० आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात ४०० सेविका जवळपास १० वर्षांपासून सेवेत आहेत,पण त्यांना या सेवेचा कार्यकाळ बघता मिळणार मानधन अतिशय तुटपुंज आहे.या सेविका अर्ध वेळ असल्या तरी सध्याच्या परिस्थितीत त्यांना पूर्ण काम करावं लागतं, ५ ये ७ किमी अंतर चालत जाऊन वाड्या वस्त्यांवर सेवा द्यावी लागते.सध्या शासनाकडून त्यांना ३००० रुपये/महिना मानधन दिले जात असल्याची माहिती मिळाली आहे.

परंतु,एवढ्या कमी पगारात त्यांच्या संसाराचा गाडा चालवण्यात असंख्य अडचणी येत असल्याचं लक्षात आल्यानंतर,परिचर संघटनेच्या काही महिलांशी याबाबत चर्चा झाली,त्यांच्या काही प्रमुख मागण्या लक्षात आल्या.या विषयावर प्रदेशाध्यक्षा रूपाली ताई चाकणकर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर हा विषय ताईंच्या मार्गदर्शनाखाली काल यशवंतराव चव्हाण सेंटर,मुंबई येथे खा.सुप्रिया ताई सुळे यांची भेट घेऊन सदर मागणीच निवेदन देण्यात आलं. याबाबत सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या उपाध्यक्षा तृप्ती साखरे यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी सुप्रिया ताई या मागणीबद्दल सकारात्मक आहेत आणि या मागणीचा विचार करून हा विषय मार्गी लावणार असल्याचं आश्वासन सुप्रिया ताईंनी दिलं आहे अस सांगितलं.

मागण्या खालीलप्रमाणे,
१: अर्धवेळ स्त्री परिचर ऐवजी पूर्णवेळ स्त्री परिचर.
२: मानधन ऐवजी वेतन करावे.
३: किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन मिळावे.
४: परिचर भरती करताना जेष्ठता यादी पाहून स्त्री परिचर म्हणून सेवेत समाविष्ट करून घ्यावे.
५: सदर परीक्षेची आवश्यकता नसावी.
६: शासकीय गणवेश मिळावा.
७: आयडी कार्ड मिळावे.
८: आजचे मानधन प्रती महिना ३००० रुपये मिळते, किमान वेतन कायद्याप्रमाणे ते मानधन ६००० मिळणे अपेक्षित आहे.
९: धुलाई भत्ता मिळावा.
१०: प्रवासासाठी सायकल मिळाण्यात यावी.
११: कार्यक्षेत्रात आरोग्यसेवा देण्यासाठी लागणारे साहित्य शासकीय बॅग मिळावी.
१२: आशा कार्यकरती प्रमाणे केंद्रा कडून हि मानधन/वेतन मिळावे.
१३: राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम,माता बालसंगोपन कार्यक्रम विशेष राष्ट्रीय कार्यक्रम राबवताना अतिरिक्त भत्ता मिळण्यात यावा.
१४: मानधन काम करत असल्यामुळे महागाई भत्ता मिळत नाही तरी शासकीय कर्मचारी म्हणून महागाई भत्ता मिळावा.
१५: भविष्य निर्वाह निधी योजने मध्ये समाविष्ट करण्यात यावे.
१६: तसेच शासकीय कर्मचारी म्हणून शासकीय विमा योजनेत समाविष्ट करण्यात यावे.
१७. अंगणवाडी सेविकान प्रमाणे दिवळी भाऊबीज व दिवाळी अँडव्हान्स मिळावा .