करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

चिखलठाण येथे वाळु उपसा करताना छापा ; इंदापूरच्या मालकासह मजुरांवर गुन्हा दाखल

करमाळा समाचार 

संग्रहीत चित्र

चिखलठाण तालुका करमाळा येथे कोठलिंग मंदिराचे शेजारी भीमा नदीच्या पात्रात पाण्यत बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा करीत असताना नऊ लाखांच्या मुद्देमालासह तीन जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई करमाळा पोलिस ठाण्याचे वतीने करण्यात आली.

दि ८ रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास चिखलठाण येथील भीमा नदीच्या पात्रात एक यांत्रिक फायबर बोटीच्या मदतीने पश्चिम बंगाल येथील तीन मजुरांच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू होता. त्या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल हिरे, पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, अनिल निकम, बारकुंड आदींनी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी एका फायबर बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू होता. त्यावेळी संबंधितांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता इंदापूर येथील फायबर बोटीचे मालक पप्पूलाल चोरमुले यांच्या सांगण्यावरून वाळू उपसा सुरू असल्याचे सांगितले.

यावेळी दहा ब्रास वाळू व आठ लाख रुपयांचे फायबर बोट पोलिसांनी ताब्यात घेतले असून चार जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. सध्या करमाळा तालुक्यात अवैध वाळु उपस्यावर कडक पावले उचलत असताना. इंदापुर भागातुन वाळु उपसा करण्याचे धाडस चांगलेच महागात पडले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE