श्री उत्तरेश्वर ज्यु. कॉलेज मध्ये स्वागत नववर्षाचे कविसंमेलन उत्साहात साजरा
केम प्रतिनिधी – करमाळा समाचार
श्री उत्तरेश्वर ज्यु. कॉलेज केम याठिकाणी नुतन वर्षानिमित्त
स्वागत नववर्षाचे हे कविसंमेलन उत्साहात साजरे झाले. यावेळी प्रथम परमपूज्य बापूजी साळुंखे यांच्या पुतळयास अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी प्रमुख पाहुणे उत्तरेश्वर देवस्थान कमिटी अध्यक्ष श्री दादासाहेब गोडसे, शालेय समिती अध्यक्ष श्री मोहनआबा दोंड तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री विष्णू कदम उपस्थित होते. यावेळी अकरावीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

या कविसंमेलनात कु. सानिका तळेकर, कु. ज्योती तळेकर, कु. लक्ष्मी देवकर, कु. पुजा तळेकर, कु. रेश्मा कोळी, कु. शुभांगी शिंदे, कु. उज्ज्वला बिचीतकर, कु. श्रुती तळेकर, कु. रुपाली देवकर या विदयार्थिनीनी बहारदार कविता सादर केल्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. यशोदा दीक्षित, शुभांगी शिंदे यांनी, तर प्रास्ताविक कु. रुपाली देवकर, आभार कु ज्योती तळेकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा. गोपीनाथ शिंदे, प्रा. मालोजी पवार, प्रा. डॉ. मच्छिन्द्र नागरे, प्रा संतोष साळुंखे, प्रा. संतोष रणदिवे, प्रा. अमोल तळेकर यांनी सहकार्य केले. सोशल डिस्टन्स ठेऊन हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.