करमाळा तालुक्यात शुल्लक कारणातुन एकाचा खुन ; संशयीताला अटक
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील साडे येथे ते दोघामध्ये झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले व त्यानंतर झालेल्या मारहाणीत विष्णु बनसोडे याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर प्रकाश लोंढेवर करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

साडे येथे दि १० रोजी भांडण झाले होते. प्रकाशने विष्णुला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करताना रस्त्यावर अनेकदा डोके आपटुन गंभीर जखमी केले.
यानंतर विष्णुला दवाखान्यात नेले तर त्याला मयत घोषीत करण्यात आले आहे. त्यानंतर करमाळा पोलिस ठाण्यात संशयीत प्रकाश लोंढेवर गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक प्रविण साने करीत आहेत.
