करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

आता ऑपरेशनची चिंता मिटली ; कोणत्याही कागदपत्रांशिवाय मोफत ऑपरेशन

करमाळा समाचार

गरीब व गरजू रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार व ऑपरेशन करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो परंतु अशा परिस्थितीत सामान्य रुग्णांना आता आधार मिळाला आहे. तो परांडाच्या डॉ. राहुल घुले यांचा त्यांनी आता करमाळा तालुक्यातील रुग्णांनाही मोफत उपचाराची घोषणा केली आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रभर ही सुविधा दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

ते आज करमाळा येथे साप्ताहिक चौफेर येथे आले होते. यावेळी शाहुराव फरतडे यांच्याकडे करमाळ्याची जबाबदारी दिली आहे.

डॉ. राहुल घुले हे भूम तालुक्यातील रहिवासी आहेत. सध्या ते आरोग्य सेवेच्या निमित्ताने मुंबई येथे कार्यरत आहेत. डॉ. घुले यांनी जन्मभूमीतील (परांडा) व गावाकडील गरजू व गरीब नागरिकांना पैसे अभावी मोठे मोठे शस्त्रक्रिया करता येत नाहीत. यामुळे नागरिकांना जीव मुकावा लागतो. त्यामुळे अशा गरीब व गरजू रुग्णालचे कसलेही आजारावर उपचार व ऑपरेशन मोफत करण्याचे काम हाती घेतलेले आहे.

त्या माध्यमातून आतापर्यंत त्यांनी जवळपास 200 शस्त्रक्रिया केल्या आहेत. तर विविध आरोग्य शिबिराच्या माध्यमातून रुग्णांना उपचार देण्याचे काम ते करीत आहे. करमाळा तालुक्यातील शिवसेना नेते शाहूराव फरतडे यांच्याशी डॉक्टर घुले यांचा संपर्क झाला व करमाळ्यातही सदर योजना सुरू करण्याचे त्यांनी सुचवले. यामुळे आता करमाळ्यातील नागरिकांनाही मोफत ऑपरेशन सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही कागदपत्राची गरज भासणार नाही. थेट दवाखान्यात जाऊन ते उपचार घेऊ शकतील. यासाठी गरजूंनी करमाळा येथील शाहुराव फरतडे तसेच शंभूराजे फरतडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सौ. कमल भीमराव घुले चॅरिटेबल हॉस्पिटल च्या माध्यमातून सुविधा पुणे व ठाणे येथे उपलब्ध आहेत.  यामध्ये उपचार शस्त्रक्रिया सह औषध व तपासण्या सर्वकाही मोफत असेल.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE