करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

योगा डे च्या निमित्ताने – 2021 मध्ये चकमदार करणारी करमाळ्याची कन्या

करमाळा समाचार

ग्रामीण भागात योगासारख्या स्पर्धा ही असू शकतात याबाबत अधिक माहिती मिळत नसे. तर योगा डे साजरा होऊ लागल्यापासून गावागावात योगा डे च्या स्पर्धा व योगा डे साजरा केला जाऊ लागला. यातून प्रेरणा घेत करमाळ्याच्या आदिती चांदगुडे (वय १५) हिने २०२१ मध्ये नॅशनल योगा फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या योगासन स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना चौथा रॅंक मिळून यश संपादन केले होते. अशा अदिती प्रत्येक गावातून घडू शकतात केवळ ग्रामीण भागात योग्य मार्गदर्शन गरजेचे असल्याचे यातून दिसून येते.

आदिती ही करमाळा येथे चौथीत शिक्षण घेत असल्यापासुन रोप मल्लखांब या खेळासाठी प्रशिक्षण घेत होती. यावेळी तिचे प्रशिक्षक नितीन शेळके व आरजु पठाण यांना तिच्या शरीराची लवचिकता दिसून आली. त्यांनी तिला योगाकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. यावेळी कोरोना परिस्थिती असतानाही या दोन्ही प्रशिक्षकांनी तिला ऑनलाईनद्वरे घरी प्रशिक्षण दिले. तिनेही ते मनापासून पूर्ण केले. अगदी कमी वयात नॅशनल पातळीवर आपले कलागुण दाखवण्याची संधी आदितीला यातून मिळाली आणि तिने या संधीचं सोनं करून दाखवलं.

शेतकरी कुटुंबात जन्मलेली अदिती ही करमाळा येथे शालेय शिक्षण घेत आहे. तिने योगात स्पर्धेत भाग घेण्याचे ठरवल्यानंतर आई-वडिलांनाही तिला पाठिंबा दिला. ग्रामीण भागातील मुलींना एवढ्या मोठ्या स्पर्धेत पाठवने हे तितकसं सोपं नसतं. पण ते धाडस चांदगुडे दाम्पत्यांनी करून दाखवलं व त्याचा मोबदला म्हणून आदितीने यशही मिळवलं. त्यामुळे त्यांचं तालुक्यात सर्वत्र कौतुक ही झालेला आहे. तिने मिळवलेल्या यशानंतर सर्व श्रेय आई-वडील तसेच प्रेक्षक प्रशिक्षकांना दिले आहे. तर या यशामुळे तिला पुढील शिक्षणाची सोयही झाली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE