करमाळासोलापूर जिल्हा

जो काम करतो त्याला लोकही प्रेम करतात ; खांबेवाडी ग्रामस्थांकडुन मनसेचा सन्मान

करमाळा समाचार


करमाळा येथील संगोबा बंधाऱ्यावर वेळेवर अधिकाऱ्यांना दारे टाकण्यास भाग पाडले. त्यामुळे खाबेंवाडी ग्रामस्थच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा चे तालुकाध्यक्ष मा.संजय (बापु) घोलप व मनसे टिम करमाळा यांचा सत्कार करण्यात आला.
सिना नदी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असुन त्यांची पिकांची चिंता मिटली असे बोलले जात आहे. या सत्कारातुन एक गोष्ट मात्र दिसुन आली की जो काम करतो करमाळ्याची जनता त्याच्यावर प्रेमही तितकच करते.

सत्कार ला उत्तर देताना संजय घोलप यांनी खांबेवाडी ग्रामस्थ व युवकांना सागितले की, जिथे आपल्या प्रपंच्याचा प्रश्न आसतो तिथे सगळेच गट तट राजकारण विसरून एकत्र आले पाहीजे व आपल्या गावातील अधिकाऱ्यांकडून जी कामे आहेत ती योग्य पध्दतीने होतात का ह्याची माहिती घेतली पाहीजे. शेवटी प्रजा असेल तरं राजा असतो. त्या मुळे फक्त मतदान विकु नका कारण पैसे देऊन मतदान केले तरं तुम्हाला विकत घेतलंय असं समजले जाते. त्या मुळेच विकासापासून आपल्याला लांब राहावे लागते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळाच्या पदाधिकाऱ्यांसह माझा सत्कार केला त्याबद्दल आम्ही कायम तुमचे ऋणी राहुन तुमच्या अडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू असा शब्द दिला. सर्व आलेल्या ग्रामस्थांचे आभार मा.पै.अशोक गोफणे यांनी मानले.

यावेळी मनसे ता.उपाध्यक्ष पै.अशोक गोफणे, शहर उपाध्यक्ष सचिन कणसे, अमोल जांभळे, किरण कांबळे, निलेश बिडवे व खांबेवाडी गावातील युवक बहुसंख्येने उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE