पी.एम किसान व ई-पीक पाहणी महसूल विभागाने करावी ; प्रहारचे निवेदन
करमाळा समाचार – संजय साखरे
केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी असलेली पी एम किसान योजनेची नोंदणी ही महसूल व कृषी विभाग यांच्यामार्फत नोंदणी करून घेण्याची जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे सदर नोंदणी बंद आहे. यामुळे नवीन लाभार्थी शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. तरी यांच्यातील जबाबदारी निश्चित करून पी एम किसान योजनेची नोंदणी ही तत्काळ चालू करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

*BREAKING NEWS – मनोहरमामा भोसलेची तब्बेत बिघडली ; पुढील उपचारासाठी पाठवले*
https://karmalasamachar.com/manoharmama-bhosles-condition-worsened-sent-for-further-treatment/
तसेच ई पीक पाहणी नोंदणी करत असताना आणि शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाहीत. अनेक ठिकाणी रेंज नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तरी ई पीक नोंदणी ही संबंधित तलाठी यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन करण्यात यावी.

*मुसळधार पावसात शेतकऱ्याचा मृत्यु ; शेतातुन घरी जात असताना झाला अपघात*
https://karmalasamachar.com/farmer-killed-in-torrential-rains-an-accident-happened-while-going-home-from-the-field/
याबाबत निवेदन प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आले. यावेळी प्रहार चे जिल्हाध्यक्ष दत्ता पाटील, उपजिल्हाप्रमुख रमेश पाटील, सोलापूर शहर अध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी, शहर संपर्क प्रमुख जमीर भाई शेख, करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, पंढरपूर तालुका अध्यक्ष नानासाहेब इंगळे, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष मोसिन तांबोळी, बापू मोहिते व प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते.