खराब रस्ता रखडलेले काम, वीज कपात ; संबंधित गावांचा मतदानावर बहिष्कार
करमाळा समाचार
तीन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कुगाव ते चिखलठाण क्रमांक एक हा रस्ता मंजूर होऊन आलेला आहे. त्या रस्त्याचे काम व आठ तास वीस या मागण्यांसाठी कुगाव व चिखलठाण येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात आज कुगाव व चिकलठाण क्रमांक दोन येथील शेतकऱ्यांनी करमाळा येथे निवेदन दिले आहे. यावेळी त्यामध्ये सदरचा रस्ता मंजूर असतानाही ठेकेदार काम पूर्ण करीत नाही. झालेले काम अत्यंत खराब झालेले आहे. तरी याबाबत तक्रारी केल्या तरी आश्वासन दिले जाते. पण काम पूर्ण होत नाही.

तसेच मागील काही दिवसांपासून उजनी परिसरात वीज कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सहा तासांवरून पुन्हा आठ तास करावी अशी ही मागणी यावेळी करण्यात आली आहे. या दोन्ही मागण्यांसाठी संबंधित गावांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.